गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (21:31 IST)

सोमय्या विरुद्ध राऊत वादावर मुश्रीफांचा अबोलपणा दिली अशी प्रतिक्रिया

भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत या वादाचा एपिसोड राज्यात रंगला आहे. या वादावर महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया येत आहेत. हा कुठेतरी थांबला पाहिजे अशा प्रतिक्रियाही येत आहे. 
 
या वादाबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता, त्यांनी मात्र सावध पवित्रा घेत टोलेबाजी केली आहे. यावर मी बोलणार नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. असा टोला मुश्रीपांना लगावला आहे. मग हा टोला सोमय्यांना आहे? की संजय राऊतांना? हे मात्र कळायला मार्ग नाही. दोन्ही बाजुंनी जहरी वाक्यांचे बाण सुटत असताना मुश्रीफांचं हे अबोलपण आता चर्चेत आलंय.