मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025 (13:11 IST)

कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी

मढी गावाच्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आल्याचा निर्णय मढी गावाच्या ग्राम पंचायतीने ग्राम सभेत मंजूर केला असल्याची माहिती मढी गावाच्या सरपंचाने दिली आहे. 
अहिल्यानगरच्या मढी गावात दरवर्षी कानिफनाथ महाराजांची यात्रा भरते ही यात्रा होळी पासून ते गुडीपाडवा पर्यंत असते. हा कालावधी ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखवट्याचा असतो.
या काळात गावात तळणे, शेतीची कामे, लग्न कार्य प्रवास सारखी कामे पूर्णपणे बंद करतात. घरात पलंगावर बसणे टाळतात.या यात्रेला मुस्लिम पण येतात जे ही प्रथा पाळत नाही. असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या कारणामुळे या यात्रेत मुस्लिम व्यापारांना बंदी घालण्यात आली आहे. गावातील ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती गावाचे सरपंच संजय मरकड यांनी दिली आहे. 
या वरून मुस्लिम समाजाच्या शिष्ट मंडळाने गट विकास अधिकाऱ्यांकडे याच्या विरुद्द्ध कारवाई करण्याची मागणी केली असून गटविकास अधिकाऱ्यांनी मढीच्या ग्रामसेवकांना कारणे  दाखवा नोटीस बजावली आहे. ग्राम सेवक, सरपंच ठरावाचे सूचक, अनुमोदक आणि उपस्थित लोकांचे जबाब घेऊन चौकशी समिती नोंदवणार आहे. त्यांनतर चौकशी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. 
Edited By - Priya Dixit