1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025 (12:44 IST)

ठाण्यात आईने केली दिव्यांग मुलीची हत्या, आजीच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली

murder
Thane News: ठाण्यात एका 17 वर्षीय दिव्यांग मुलीची तिच्याच जन्मदात्री आईने हत्या केली आणि मुलीच्या आजी आणि एका अनोळखी महिलाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. 
ठाण्यातील नौपाड्यातील गावदेवी परिसरात ही हत्या करण्यात आली मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मयत मुलगी जन्मापासूनच शारीरिक दिव्यांग होती मुलगी चालण्यास बोलण्यास सक्षम नव्हती. ती अंथरुणावर होती. 15 फेब्रुवारी पासून ती गंभीर आजाराने ग्रस्त होती. तिच्या आईने 19 फेब्रुवारीच्या रात्री तिला एक औषध दिले या मुळे तिचा मृत्यू झाला.
नंतर आईने मुलीच्या आजीच्या मदतीने आणि एका अनोळखी महिलाच्या मदतीने रात्री 1:30 वाजता मुलीचा मृतदेह पांढऱ्या चादरीत गुंडाळला आणि कार मध्ये नेऊन अज्ञात स्थळी नेऊन टाकला.तीन महिला मृतदेह गाडीत टाकून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 
एका महिलेने माहिती दिल्याने भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत तिन्ही महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit