ठाण्यात चित्रपट उद्योगात काम देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार
चित्रपट उद्योगात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका 34 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार करण्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठाण्याच्या एका व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात आणखी एका महिला, तिच्या पतीवर आणि मुलीवर पीडितेला धमकावून ब्लेकमेल करण्याचा आरोप आहे.
पीड़िता ठाणे शहरातील माझिवाडा परिसरातील रहिवासी असून आरोपी महिला सुमारे तीन वर्षांपूर्वी पीडितेला भेटली आणि तिने दावा केला की तिचे चित्रपट उद्योगतील उच्चपदस्थ लोकांशी संपर्क आहे आणि तुला मोठी अभिनेत्री बनवून देऊ. असे आश्वासन दिले. आरोपी महिला पीडितेला सिंगपुरात घेऊन गेली आणि तिने तिथे पीड़ित महिलेची ओळख एका पुरुषाशी करुन दिली. नंतर आरोपी व्यक्तिने तिला त्याच्या घरी बोलवले आणि तिला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने मुंबई आणि इतर ठिकाणी हॉटेल मध्ये नेऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.
नंतर आरोपी महिलेने पीडितेचा पुरुषसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला आणि तिला ब्लेकमेल करु लागली. आरोपी महिला, तिचा पती आणि मुलगी पीड़ित महिलेला फोन करूं धमकावू लागले.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध बलात्कार, गुन्हेगारी धमकी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केली नाही. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit