मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (08:06 IST)

भंडाऱ्यात शासकीय कार्यालयात मटणाचे भोजन; अधिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या निलंबिनाची मागणी

भंडाऱ्यात शासकीय कार्यालयात मटणाचे भोजन करून पार्टी केल्याची घटना घडली होती. या सर्व प्रकरणावरून जय जवान जय किसान संघटना आक्रमक झाली असून अधिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
 
भविष्य निधी वेतन अधीक्षक कार्यालयात मटण पार्टी प्रकरणी जय जवान जय किसान भंडारा जिल्हा अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या अध्यक्षतेखाली जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत घेराव घालण्यात आला. यावेळी भरदिवसा शासकीय कार्यालयात मटणाचे भोजन करणाचे काम अधिक्षक व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी गेले असून शिक्षण क्षेत्राला गालगोट लावण्यासह काळीमा फासण्याचे कृत्य या कार्यालयात झाले आहे. यामुळे शिक्षण विभागाचीही जाहीर बदनामी झाली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात मटणाचे भोजन करणाऱ्या अधिक्षक व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेने केली.