रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2020 (13:18 IST)

कोल्हापुरात आजपासून मटण विक्री सुरू

कोल्हापुरात मटणाच्या दरावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, या वादावर तोडगा निघाल्याने सर्वांना हायसे वाटले आहे. मटण विक्रेते कृती समितीने आजपासून 520 रुपये प्रति किलो दराने उत्तम प्रतीच्या मटणाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
कोल्हापुरात मटण दरवाढ झाल्यानंतर मटण दरवाढ विरोधी कृती समितीन प्रति किलो 480 रुपये दराने मटणाची विक्री व्हावी असा आग्रह धरला होता. मात्र हा दर परवडत नसल्याचे सांगत मटण विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवली होती. पण आता या तोडग्यामुळे येथील व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात मटणविक्री बंद असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी फक्त चिकन सर्व्ह करणे सुरू केले होते.
 
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा या उपनगरात मटण दरवाढीवर वादाची पहिली ठिणगी पडली होती. येथे 560 ते 580 रुपये किलो दराने विक्री सुरू केली. मात्र, इतर ठिकाणी मटण 460 किलोने मिळत असताना गावात मात्र मटण विक्रेते आर्थिक लूट करत असल्याचा आक्षेप लोकांनी घेतला होता.