रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

देशातील पहिली घटना मटण दरासाठी या जिल्ह्यात स्थापन झाली समिती

शहर वजिल्ह्यातील मटण दराबाबत सविस्तर अभ्यास करुन तोडगा काढण्यासाठी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने ७ डिसेंबररोजी आपला अहवाल जिल्हादंडाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे.* मटण दरावरुन शहरात काही ठिकाणी मटण विक्रेते व ग्राहक यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नागरिक आणि पक्ष संघटनांनी आंदोलनेही केली.  खाटीक समाज आणि मटण दरवाढ कृती समिती यांची आज जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांच्या दालनात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली.

महापालिका आरोग्य अधिकारी या समितीचे अध्यक्ष  तर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त हे सदस्य सचिव आहेत. बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, आर के पोवार, सुजीत चव्हाण, विजय कांबळे, प्रकाश प्रभावळकर, रहीम खाटीक, राजू शेळके, किरण कोतमिरे आणि कसबा बावडा येथील श्री पाटील हे या समितीचे सदस्य आहेत.  या समितीने शहर आणि जिल्ह्यामधील बकरा मटण बाबत सविस्तर अभ्यास करुन कृती समिती आणि मटण विक्रेते यांच्या भूमिकेबाबत तोडगा काढण्यासाठी सविस्तर अहवाल ७ डिसेंबर रोजी जिल्हादंडाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे.अशाप्रकारे समिती स्थापन करून मटण दर निश्चित करण्याचे बहुदा हे देशातील एकमेव उदाहरण असेल. संघर्ष करणारे नागरिक व ज्यांच्या विरुद्ध संघर्ष आहे अशा दोघांनाही एकत्र करून मटण दरासाठी समिती नेमण्याचे काम जिल्हाधिकारी यांचेकडून होत आहे. समाजात सुसंवाद राहावा यासाठी जिल्हाप्रशासनाकडून होणारे प्रयत्नही आगळे-वेगळे आहेत.