बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (13:50 IST)

सोनिया, मनोहनसिंग यांना शपथविधीचे निमंत्रण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज(गुरूवारी) मुंबईत दादर येथील शिवतीर्थावर भव्यदिव्य सोहळ्यात शपथ घेणार असून या सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी उद्धव यांचे पुत्र व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. आदित्य यांची ही पहिलीच सोनियाभेट ठरली. 
 
दिल्लीत दाखल झाल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ते थेट सोनिया गांधी यांच्या '10 जनपथ' निवासस्थानी दाखल झाले. सोनिया यांची भेट घेऊन आदित्य यांनी शपथविधी सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण सोनिया यांना दिले. हे आमंत्रण सोनिया यांनी स्वीकारले आहे. आदित्य यांच्यासोबत मिलिदिं नार्वेकरही होते. सोनिया या शपथविधी सोहळ्याला येणार की नाहीत, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. सोनिया यांच्या भेटीनंतर आदित्य हे माजी पंतप्रधान डॉ. नोहन सिंग यांचीही भेट घेऊन त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.