मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (12:19 IST)

उध्दव ठाकरे यांचे फोनवरून मोदींना शपथविधीचे निमंत्रण

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असलेले शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उध्दव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन केला व शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधानांनी उध्दव यांना विशेष शुभेच्छा दिल्या. दरम्यान, उद्धव यांचे निमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले असले तरी ते
शपथविधी सोहळ्याला येणार का, याबाबत मात्र कोणतीच अधिकृत माहिती नाही. उद्धव यांनी रात्री मोदी यांना फोन केला. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अवघी दोन ते तीन मिनिटं चर्चा झाली. या चर्चेत उद्धव यांनी शपथविधीला येण्यासाठी मोदींना आग्रह केला तर मोदींनीही मुक्तकंठाने उद्धव यांना महाराष्ट्राची धुरा वाहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.