शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (10:53 IST)

'म्हणून' मोदींचे चार वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. त्यांच्या शपथविधीनंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंद करणारे ट्विट केले आहे. या ट्विटनंतर मोदींचे चार वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल झाले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार वर्षांपूर्वी कॉंग्रेसवर टीकासस्त्र करणारे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये एनसीपी म्हणजे नॅच्युरल करप्टेड पार्टी. यांच्या घडाळ्याचीत १० वाजल्याचा आकडा दहा वर्षात दहा घोटाळे केल्याचे दर्शवत आहे. मात्र, आता त्याच एनसीपीचे प्रमुख नेते भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करत ते ट्विट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.