बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: कोलकाता , शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (10:31 IST)

आर्थिक मंदीवरून ममतांचा मोदींना सल्ला

देशातील सध्याच्या आर्थिक मंदीवरून विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका होत असताना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्थिक मंदीच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदींना तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला दिला आहे. निर्गुंतवणूकहा काही तोडगा नाही. यामुळे आर्थिक संकट आणखी वाढेल. 
 
मला वाटते पंतप्रधानांनी तज्ज्ञांशी चर्चा करावी. गरज पडल्यास त्यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलवायला हवी, कारण हा देश सर्वांचा आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय धोरणात बदल केला असल्याचे यावरून दिसून येत आहे.