आता चार वर्षांवरील मुलांना हेल्मेट सक्ती
केरल हायकोर्टाने दुचाकीवरुन प्रवास करणार्या सवारींना आता हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. यात चार वर्षांवरील मुलांचा देखील समावेश आहे. आदेशानुसार दुचाकीवरून प्रवास करणार्या चार वर्षांहूनही अधिक वय असलेल्या मुलांसाठी देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
कोर्टाने राज्य सरकाराला नवीन नियमाबद्दल लोकांना नोटिस जारी करुन तसेच होर्डिंग्स लावण्याचे निर्देश दिले आहेत.