रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (12:43 IST)

कलयुगी वडिलांचं कृत्य, 14 वर्षाच्या पीडितेने मुलीला जन्म दिला

दुष्कर्म केल्यानंतर गरोदर राहिलेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला. डिलेव्हरीनंतर नवजात मुलीची स्थिती नाजुक आहे. नवजात कन्येला बाल कल्याण समितीला सोपवण्यात आले आहे.
 
ही घटना सिरसा जिल्हाच्या कालांवाली भागातील आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवर 30 ऑक्टोबरला तिच्या वडिलांविरुद्ध केस दाखल करून त्याला अटक केली होती. नववी वर्गात शिकत असलेल्या मुलीने सांगितले की वडिलांनी जेवण्यात मादक पदार्थ मिसळून तिच्यावर अत्याचार केला.
 
काही दिवसांनी पोटदुखीमुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा ती गरोदर असल्याचे कळले. तेव्हा तिने आईला हकीकत सांगितली. आरोपी वडील पोलिस कोठडीत आहे.