मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गणित, विज्ञान, इंग्रजी शिवाय दहावी देता येणार

गणित, विज्ञान, इंग्रजी या विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयांशिवाय आता परीक्षा देता येणार आहे. येत्या जानेवारी २०२० पासून मुक्त विद्यालयाचे दहावीचे वर्ग सुरु होणार आहेत. आठवी उत्तीर्ण किंवा वयाची पंधरा वर्षे पूर्ण असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला दहावीचा प्रवेश मिळणार आहे.
 
मुक्त विद्यालयाचा अभ्यासक्रम दहावी बोर्डाप्रमाणेच असणार आहे. दोन भाषा विषयांसह कोणतेही तीन अशा एकूण पाच विषयांची निवड विद्यार्थ्यांना करता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण २१ व राष्ट्रीय कौशल्य विकास अभ्यासक्रमातील एकूण १४ विषयांमधून हे विषय निवडता येणार आहेत. नोंदणी केल्यानंतर पाच वर्षापर्यंत परीक्षा देण्याची सवलत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सोयीनुसार कोणत्याही एका विषयाची परीक्षा देता येणार आहे.
 
मुक्त विद्यापीठाप्रमाणेच मुक्त विद्यालयाची केंद्र नियुक्त केली जातील. या केंद्रात प्रवेश घेणाऱ्यांना शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. या केंद्रांवर त्या मुलांना त्यांनी निवडलेल्या विषयानुसार शिकवण्या दिल्या जातील. ही केंद्रे सरकारमान्य असल्यामुळे तेथून दहावी उत्तीर्ण होणाऱ्यानाही नियमित शाळेच्या प्रमाणपत्राच्या दर्जासारखेच प्रमाणपत्र मिळेल.