सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (12:15 IST)

गोडसे देशभक्त ; साध्वींच्या विधानाने गदारोळ

भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एकदा नथुरा गोडसे देशभक्त असल्याचे विधान केले आहे. लोकसभेत एका चर्चेत भाग घेताना त्यांनी हे विधान केले. त्यावर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातला. दोन्ही बाजूच्या बाकांवरील सदस्यांनी गोंधळ सुरू केल्याने संसदेचे वातावरण चांगलेच तापले होते.
 
लोकसभेत एसपीजी दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू होती. त्यावेळी डीएकेचे खासदार ए. राजा यांनी गोडसेने महात्मा गांधीची हत्या का केली? असा संदर्भ देत होते. 
 
गोडसेच्या मनात गांधीजींबाबतचा द्वेष 32 वर्ष होता. त्यामुळे त्यांनी गांधीजींची हत्या केली. वेगळ्या विचारधारेचा असल्यामुळेच त्यांनी गांधीजींची हत्या केली. तशी कबुलीही गोडसेने दिली होती, असे राजा म्हणाले. तेवढ्यात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राजा यांना मध्येच थांबवले आणि तुम्ही एका देशभक्तेचस उदाहरण लोकसभेत देऊ शकत नाही, त्यामुळे संसदेत एकच गदारोळ उडाला. यावेळी भाजपच्या अनेक खासदारांनी साध्वीची बाजू घेत गोंधळ घातला. तर काही खासदारांनी साध्वींना जागेवर बसण्याची विनंतीही केली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने संसदेचे वातावरण चांगलचे तापले होते. दरम्यान, या विधानाप्रकरणी साध्वींवर कारवाई होण्याची शक्यता भाजच्या सूत्रांनी वर्तवली आहे.