शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (08:30 IST)

मविप्रत अ‍ॅड.नितीन ठाकरे यांनी पहिली बैठक घेत कामकाजास केली सुरुवात

रयत शिक्षण संस्थेनंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने २१ पैकी २० जागा जिकंत सरशी केली. या निवडणुकीत सर्वाधिक महत्त्वाच्या असणा-या सरचिटणीसपदाच्या जागेवर अ‍ॅड.  नितीन ठाकरे यांनी ५ हजार ३९६ मते मिळवत विजय मिळवला. त्यानंतर आज दुस-याच दिवशी  नितीन ठाकरे यांनी यांनी शिक्षणाधिकरी यांच्या समवेत पहिली बैठक घेत कामकाजास प्रारंभ केला. यावेळी सभापती बाळासाहेब शिरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, लक्ष्मण लांडगे, संस्थेचे प्रमाणित लेखा परीक्षक राजाराम बस्ते हे बैठकीत उपस्थिती होते.या बैठकीनंतर संस्थेचे मावळते अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी सरचिटणीस नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्क्ष विश्वासराव मोरे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार केला.