इगतपुरी तालुक्यात कारमध्ये आढळला जळालेला मृतदेह
इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडीजवळ एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळला आहे.हा मृतदेह महिलेचा की पुरुषाचा याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहासह कारला आग लावल्याने ही कार देखील जळून पूर्णपणे खाक झाली आहे. कारचे दोन्ही बाजूकडील नंबर प्लेटा जळून गेलेल्या आहेत.मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवहे परिसरातील मिलेट्रीच्या हद्दीत काही महिन्यापूर्वी एका डॉक्टर महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याची घटना झाली होती. त्यानंतर मंगळवारी ही दुसरी घटना समोर आली आहे. घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.