शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (08:01 IST)

तुमची बहिण म्हणून माझी इज्जत महत्त्वाची आहे सुषमा अंधारें यांचा देवेंद्र फडणवीसवर हल्ला बोल

sushma andhare
नागपूर हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर आता सुषमा अंधारेंनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. अमृता फडणवीसांचा उल्लेख करत अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला. तसेच आरोप केलेल्या विषयांवर फडणवीसांनी खुली चर्चा करावी, असं आव्हान दिलं. त्या मंगळवारी सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
 
सुषमा अंधारे म्हणाल्या, “भरत गोगावलें विषयी व्हॉट्सअॅप चॅटवर एक अपशब्द निघाला, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुन्हा दाखल करून घेतात. सुषमा अंधारेला दिवसाढवळ्या जीवे मारण्याच्या धमक्या रोज दिल्या जातात. सोशल मीडियावर एका महिलेला अत्यंत गलिच्छ पद्धतीने बोललं जातं, त्यावर देवेंद्र फडणवीसांची जीभ अजिबात उचलत नाही.”
 
“देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांबद्दल कोणी बोललं तर फडणवीसांचे भक्तुल्ले तुटून पडतात. जेवढी आमच्या वहिनींची इज्जत महत्त्वाची आहे, तेवढीच तुमची बहिण म्हणून माझी इज्जत महत्त्वाची आहे. यावर फडणवीसांनी एकदा तरी बोलावं. कुठे शिळ्या कढीला उत आणत आहात,” अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

Edited By -Ratnadeep Ranshoor