रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 डिसेंबर 2016 (17:11 IST)

नगरपालिका निवडणूक भाजपा अजूनही पुढे ५ ठिकणी सत्ता

Nagarpalika Election result voting नगरपालिका निवडणूक निकाल मतदान
महाराष्ट्रातील आज  दुसऱ्या टप्प्यात  2 जिल्ह्यातील 14 नगरपालिकांसाठी मतदान झालं होतं. या सर्व नगरपालिकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये पुणे येथील बारामती वर पवारांची पकड कायम असून, देशमुखांच्या लातूर येथील निलंगा येथे भाजपाने पूर्ण सत्ता मिळवली आहे. 
 
पुण्यातील जेजुरी, बारामती, तळेगाव, लोणावळा, दौंड, सासवड, शिरूर, आळंदी, इंदापूर, जुन्नर या नगरपालिकांसाठी मतदान झाले.लातूर जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा या नगरपालिकांसाठीही मतदान झालं आहे. तर भाजपाने आपली घोडदौड सुरु ठेवली असून एकूण निवडणुकीत १४ पैकी पाच जागांवर म्हणजेच नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष असणार आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी  मात्र मागे पडली आहे.तर भाजपा मित्र पक्ष फक्त १ जागेवर त्यांनी विजय मिळविला आहे.