मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (12:57 IST)

नागपूर : नातवाला मारले म्हणून CRPF चे रिटायर जवानाने स्वतःच्या मुलावर चालवली गोळी

महाराष्ट्रातील नागपूर मध्ये CRPF च्या एक रिटायर जवानाने आपल्या स्वताच्याच मुलावर गोळी झाडली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार गोळी का झाडली याचे कारण असे की या रिटायर जवानाचा मुलगा त्याच्या चार वर्षाच्या मुलाला मारत होता. नातवाला मुलगा मारतो हे सहन झाले नाही म्हणून स्वतःच्या मुळावरच गोळी झाडली. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी नागपूर मधील चिंतामणी नगरमध्ये घडली आहे. आरोपी वर्तमान मध्ये बँक कॅश व्हॅनसाठी सुरक्षा गार्ड म्हणून काम करीत होता. त्याने आपल्या चार वर्षाच्या नातवाला रागवतात म्हणून मुलाला आणि सुनेला रागावले होते. वाद एवढा वाढला की, आरोपीने रागाच्या भरात आपल्या लाइसेंसी रायफल ने स्वतःच्या मुलावर गोळी झाडली. 
 
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आणि पायावर गोळी लागलेल्या आरोपीच्या मुलाला रुग्णालयामध्ये दाखल केले. सुदैवाने आरोपीच्या मुलाची प्रकृती स्थिर आहे असे चिकिस्तकांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीला हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियम उल्लंघन आरोपांमध्ये अटक केली आहे. चौकशी दरम्यान या आरोपीने पोलिसांना सांगितले की, ते आपल्या नातवासोबत झालेल्या दुर्व्यवहारामुळे नाराज होते.