मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (11:13 IST)

महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये आज कोसळणार पाऊस, विदर्भ, मराठवाडासाठी येलो अलर्ट घोषित

monsoon update
महाराष्ट्रामध्ये मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांगितले जाते आहे की, राज्यामध्ये कोकण सोडून बाकी सर्व ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. या दरम्यान हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भ मध्ये पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे. आईएमडीने पावसाला पाहत विदर्भ आणि मराठवाडासाठी येलो अलर्ट घोषित केला आहे. 
 
हवामान विभागानुसार, मराठवाडा मधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार अशी शक्यता वर्तवली आहे. तर, विदर्भच्या बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपुर, चंद्रपुर गोंदिया आणि भंडारा मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस-
आईएमडी ने सांगितले की, उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे, सतारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. 
 
कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता-
कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची संभावना व्यक्त केली आहे. तर मुंबई सोबत मुंबई उपनगरांच्या अनेक भागांमध्ये हलका पाऊस पडण्याचे अनुमान हवामान खात्याने दिले आहे. तर पुण्यामध्ये कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. पण दिवसभर आभाळ राहील. सोबतच घाट परिसरात येलो अलर्ट घोषित केला आहे. 
 
मुंबईमध्ये पाऊस थांबल्याने दिलासा-
मुंबई मध्ये रविवारी आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर मंगळवारी पाऊस थांबल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमान आणि रस्ते खंडित झाले होते. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकलसेवा देखील प्रभावित झाली होती. रुळावर पाणी भरल्याने अनेक रेल्वे निर्धारित वेळेपेक्षा उशिराने चालल्या.