मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (14:18 IST)

Nagpur : तासाभराच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

operation
असं म्हणतात की कोणाचा मृत्यू कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. काळ आला पण वेळ आली नाही असे काहीसे घडले आहे. नागपूरच्या रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका रुग्णाच्या हृदयाचे ठोके सुमारे 1 तास थांबले. तासाभराने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असे म्हणता येईल. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांनी चमत्कार घडला आणि तासाभरानंतर त्याच्या हृदयाचे ठोके परत आले. वास्तविक, 25 ऑगस्ट रोजी एका 38 वर्षीय व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना 45 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. 13 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता.
 
 या रुग्णाच्या हृदयाचे ठोके 40 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद झाले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋषी लोहिया यांनी त्यांना 40 मिनिटांसाठी सीपीआर देण्याचा निर्णय घेतला. व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन मॉनिटरवर दिसत होते. रुग्णाला सीपीआरसह डिफिब्रिलेशन शॉक दिले जात होते. हृदय पुन्हा धडधडू लागेपर्यंत हे चालूच होते.
 
रुग्णालयातील नोंदीनुसार त्यांना 45 मिनिटांसाठी सीपीआर देण्यात आला. डॉ. लोहिया म्हणाले की, पहिला सीपीआर 20 मिनिटे चालला. दरम्यान हृदयाचे ठोके 30 सेकंद चालू राहिले. ते म्हणाले, कार्डियाक मसाजसोबत शॉकही दिले जात आहेत. त्यामुळे हृदय गती पूर्ववत होण्यास मदत झाली. इतक्या वेळ  मसाज करूनही रुग्णाच्या बरगड्या तुटल्या नाहीत आणि शॉकने त्याची त्वचाही भाजली नाही. योग्य उपचारांमुळे हे शक्य झाले.













Edited by - Priya Dixit