Nagpur : नागपुरात खोदकाम करताना आई जगदंबेचा मुखवटा सापडला
Nagpur :नवरात्रोत्सव अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यापूर्वी नागपुरात एका खाली प्लॉटचे खोदकाम करताना आई जगदंबेचा मुखवटा सापडला आहे.
सदर घटना समतानगर परिसरातील अन्वर लेआऊट येथे घडली आहे. या ठिकाणी एका खाली प्लॉटवर पाईपलाईनचे खोदकाम सुरु झाले आणि मजुरांना खोदताना आई जगदंबेचा मुखवटा सापडला. महसूल विभागाने याचा पंचनामा केला असून पुरातत्व विभाग याची तपासणी करणार आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. मुखवटा सापडल्यानंतर लोकांनी आई जगदंबेच्या मुखवट्याची पूजा करण्यास सुरु केले. या ठिकाणी भाविकांनी गर्दी करायला सुरु केले.पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. नागरिकांकडून देवीच्या मंदिराचे बांधकाम करण्याची मागणी सुरु आहे. मुखवटा किती काळ जुना आहे अद्याप हे समजू शकले नाही.
नागपूरच्या समता नगर भागात मंगळवारी खोदकाम करताना आई जगदंबेचा मुखवटा सापडल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाविकांनी मुखवट्याची पूजा सुरु केली. मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी येत आहे.
Edited by - Priya Dixit