मंगळवार, 17 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 डिसेंबर 2024 (10:18 IST)

नागपूर: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

court
पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2018 साली घडली होती. त्यावर न्यायालयाने सोमवारी निकाल दिला.
 
सदर घटना 25 डिसेंबर 2018 रोजीची आहे. पीड़ित मुलगी तिच्या मित्रांसोबत घरासमोर एका मोकळ्या मैदानात खेळत असताना आरोपी तिथे आला आणि त्याने पीड़ित कड़े व तिच्या मित्राकडे पिण्यासाठी पाणी मागितले. पीड़ित मुलगी घरात पाणी घेण्यासाठी गेली असता आरोपी तिच्या मागे घरात शिरला. घरात पाणी प्यायल्यानान्तर त्याने मुलीच्या मित्राला तिथुन जायला सांगितले मात्र तो तिथुन जाण्यासाठी तयार नव्हता. दरम्यान, पीडितेचा मित्र आरोपीच्या मोठ्या बहिणीला बोलावण्यासाठी गेला असता, पीड़ित मुलगी घरात एकटी असता आरोपीने तिच्यावर बळजबरी करून तिथुन पळ काढला. 
 
या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीने घरच्यांना सांगितल्यावर कळमेश्वर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) आणि POCSO कायद्याच्या कलम 4, 7, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांनी न्यायालयात बाजू मांडली, सुनावणीदरम्यान अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.पी.पांडे यांनी आरोपीला कलम 6 पोक्सो कायद्यान्वये 20 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बलात्कार करणाऱ्याने दंड न भरल्यास त्याला एक वर्षाची अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल, असेही सांगण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit