नागपूर हवामान विभागाकडून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यात विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात यंदा सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार असल्याची शक्यता नागपूर हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूर हवामान विभागाचे डायरेक्टर मोहनलाल शाहू यांनी याबाबत माहिती दिली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच यंदा विदर्भातील तापमानात वाढ झालीय. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर यासहं अनेक जिल्ह्यात सरासरी तापमानापेक्षा जास्त तापमान आहे. यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भात तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे., अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी दिली.
नागपूर हवामान विभागानं विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअस जास्त तापमान राहणार आहे, असं अंदाज वर्तवण्यात आला आहे.