सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (15:54 IST)

नागपूर: सायबर फसवणूकीत 60 लाख रुपये गमावल्याने केली आत्महत्या

death
सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात सायबर फसवणुकीमुळे एका व्यक्तीने 60 लाख रुपये गमावले. या धक्क्यात 51 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 
 
नागपुरात गणेशपेठ परिसरातील एका हॉटेलच्या रूम मध्ये मृतावस्थेत आढळला असून पोलिसांना त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. सदर व्यक्ती 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी हॉटेल मध्ये आला नंतर तो खोलीतून बाहेर पडलाच नाही. मास्टर चावीने दार उघडल्यावर तो बेशुद्द्धावस्थेत आढळून आला.अक्षय बाहेकर असे या व्यक्तीचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी तो गणेशपेठेतील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आला असून त्याने आत्महत्या केली. खोलीतून तो बाहेर पडला नाही आणि दार ठोठवल्यावर त्याने काहीच उत्तर दिले नसल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्याने मास्टर की ने दार उघडल्यावर तो बेशुद्धावस्थेत आढळला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी मयत अक्षयला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांना हॉटेलच्या खोलीत एक सोसाइड नोट सापडली असून त्याने ऑनलाईन फसवणुकीमुळे 60  लाख रुपये गमावल्याने आत्महत्या केल्याचे लिहिले आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ने काही विषारी औषधाचे सेवन केल्याने मृत्यू झाल्याचा संशय आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. पोलीस पथक फसवणुकीचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. 
Edited By - Priya Dixit