गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (17:39 IST)

Nalasopara :27 वर्षीय बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nalasopara :सध्या हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाच्या मृत्यूच्या बातम्या सतत येत आहे. अति व्यायामामुळे देखील जिम मध्ये जाणारे तरुण मृत्युमुखी होत आहे.बॉडी बनवायची म्हणून हे तरुण अति व्यायाम करतात आणि त्यांचा परिणाम हृदयावर होतो आणि हृदय विकाराचा झटका येतो. डॉक्टर देखील क्षमतेपेक्षा अति व्यायाम न करण्याचा सल्ला देतात. अशाच एका 27 वर्षीय बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. अजिंक्य कदम असे या मयत बॉडी बिल्डरचे नाव होते. 
 
अजिंक्य नालासोपारा पूर्व येथे मोरेगावच्याआरंभ कॉलोनीत राहणारा असून सोमवारी त्याला अस्वस्थता जाणवू लागली त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 
 
त्याच्यावर प्रथमोपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. अजिंक्य ने 75 कि.ग्रा. वजन गटातून बॉडी बिल्डिंगमुळे बरेच पारितोषिक मिळवले. आपल्या कुटुंबात तो मोठा असून त्याच्या पश्चात आई वडील तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे अजिंक्यच्या कुटुंबावर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


Edited by - Priya Dixit