बुधवार, 6 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (13:45 IST)

Nanded :किरकोळ वादातून फळ विक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटले

crime
Nanded : पुण्यातील कोयत्या गॅंग नंतर आता नांदेड मध्ये कोयता गॅंगचे दहशत पसरले आहे. पुण्यातील कोयत्या गँगचा नायनाट केल्यानंतर आता नांदेड मध्ये कोयता गॅंग सक्रिय झाले आहे. किरकोळ वादातून एका फळ विक्रेत्याने तरुणाचे मनगटापासून दोन्ही हात छाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
सदर घटना नांदेड शहरातील भाग्यनगर हद्दीत घडली आहे. केवळ हसण्याच्या कारणावरून एका फळ विक्रेताने भाजी विकणाऱ्या एका तरुणाचे  दोन्ही हात मनगटापासून छाटले आहे. 

शहरातील आठ्वड्याबाजारात बुधवारी भर दुपारी ही घटना घडली आहे. मोह्हमद तोहीद असे आरोपीचे नाव असून हा फळ विकण्याचा व्यवसाय करतो. तर जखमी मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज असे जखमी तरुणाचे नाव असून हा भाजी विकण्याचे काम करतो. बुधवारी पीडित मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज आठवड्या बाजारात आलं , लसूण विक्रीसाठी गेला असता त्याच्या शेजारी आरोपी मोहम्मद तोहीद हा देखील हात गाड्यावर फळ विकत होता. 

एकाएकी कोणत्यातरी गोष्टींवरून हसण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वाद विकोपाला जाऊन आरोपी मोहम्मद तोहीद संतापला आणि कोयता खरेदी करून त्याच्यावर धार लावून संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास बाजारात येऊन त्याने मोहम्मद अझर मोहम्मद अजीजचे दोन्ही हात मनगटापासून छाटले. या घटनेत मोहम्मद अजीज जखमी झाला असून त्याला तातडीनं रुग्णालयात नेले. या घटनेनन्तर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

Edited by - Priya Dixit