1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By

'बंदा बहादूर' कसे बनले गुरु गोबिंद सिंहजी यांचे शिष्य ?

बाबा बंदा सिंह बहादूर यांचा जन्म २७ ऑक्टोबर १६३० मध्ये जम्मूच्या राजपूत कुटुंबात झाला होता. यांचं मूळ नाव ‘लछमन दास’ होतं आणि लोकं यांना ‘माधव दास’ पण म्हणायचे. शिकार करायचं छंद असणारे बाबा बंदा सिंह यांनी एके दिवशी गर्भवती मृगाला मारून दिल्यावर नंतर त्यांना खूप पाश्चात्याप झाला आणि ह्याचा नंतर  त्यांनी १५ वर्षाच्या वयात साधू व्हायचा निर्णय घेतला.
 
सुरुवातीला ह्यांनी 'जानकी दास' ह्यांना आपला गुरु मानून त्यांच्याकडून शिक्षा प्राप्त केली. शिक्षा प्राप्त केल्यावरही जेव्हा त्यांना शांती भेटली नाही तेव्हा त्यांनी आता ते एका अशा गुरुच्या शोधात होते जे त्यांचे मन शांत करू शकत असत. गुरुच्या शोधात त्यांनी तांत्रिकांशी तंत्र विद्या ही घेतली आणि नांदेड (महाराष्ट्र) येथे स्वतःचे एक आश्रम पण स्थापित केले. पण त्यांचा शोध काही संपला नव्हता.
 
सप्टेंबर १७०८ मध्ये गुरु गोबिंद सिंह माधव दासच्या आश्रमात पोहचतात. माधव दासाची अनुपस्तिथीमध्ये त्या तिथे सिंहासनावर बसून जातात आणि डेरा टाकून त्यांचे साथी खाण्या -पिण्याची व्यवस्था करू लागतात. जेव्हा माधव दासांना हे माहित पडतं तेव्हा ते रागात तेथे येऊन गुरु गोबिंद सिंह जींना विचारतात " कोण आहात आपण?'". ह्याचे उत्तर देत गोबिंद सिंह जी म्हणतात, तुझा जवळ सगळी विद्या आहे, तुला नाही माहित कोण आहे मी? थोडा विचार करून ते म्हणाले "तुम्ही गुरु गोबिंद सिंह आहात?".
 
"हो, तू कोण आहे ?" गोबिंद सिंह जी म्हणाले. आपला सगळं गुरुंच्या पायावर ठेवून ते म्हणतात "मी तुमचा बंदा (दास)".
 
ह्या प्रकरणानंतर माधव दास ह्यांनी सिख धर्म (खालसा) स्वीकारले आणि यांचे नाव गुर बक्ष सिंग ठेवले गेले पण ते बंदा बहादूर ह्या नावाने ओळखले गेले. तर असे मिळाले बाबा बंदा बहादूरला त्यांचे गुरु.