बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (10:48 IST)

नंदुरबार :बस आणि टेम्पोच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

A private bus and a tempo collided head-on on Thursday afternoon on Shahada Bypass
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातून गुजरातच्या सौराष्ट्रात मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस आणि टेम्पोमध्ये गुरुवारी दुपारी शहादा बायपास वर समोरा समोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर 17 जण या अपघातात जखमी झाले.अपघातात मृत्युमुखी झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातून रोजगारासाठी मजुरांना गुजरातच्या सौराष्ट्रात घेऊन जाणारी खासगी बस आणि टेम्पोत समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 17 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Edited By - Priya Dixit