शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (09:19 IST)

13 गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा अपघात

एका धक्कादायक घटनेत 13 गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या एका ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून गरोदर महिला थोडक्यात बचावल्या.
 
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा लोणखेडा कॉलेज गेटसमोर रुग्णवाहिकेचा अपघात झाला. गरोदर महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी घेऊन जाणारी ऍम्ब्युलन्स पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. या अपघातात 14 जण जखमी झाले आहे.
 
अपघातामध्ये जखमी झालेल्या गरोदर महिलांना शहादामधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. ऍम्ब्युलन्सचा अपघात कसा झाला यावर अधिक तपास सुरू आहे.
 
पोलीस या अपघात प्रकरणी अधिक तपास करत आहे. मात्र सुदैवाने या अपघातामध्ये 13 गरोदर महिला बचावल्या आहेत.