शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (09:44 IST)

नाशिक हा पर्याय असू शकत नाही : नारायण राणे

माझा नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार नाही. नाशिक हा पर्याय असू शकत नाही. मला कसे निवडून आणायचे हा विषय मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याचे अन्यही अनेक पर्याय आहेत, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये ते  बोलत होते.

आता सत्तेसाठी नारायण राणे स्वत: पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिकमधून निवडणूक लढविण्यासाठी अधिकारपदावरील एकाही व्यक्तीने संपर्क साधला नव्हता, असेही राणे म्हणाले.  ‘जे बोलू ते करू’ असे आपल्या पक्षाचे घोषवाक्य असेल, असेही त्यांनी सांगितले.