गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नारायण राणेंनी भाजपमध्ये जावे

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा मागील महिन्याभरापासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र यावर अद्याप नारायण राणे यांनी स्पष्ट भूमिका जा‍हीर केली नाही.
 
मात्र नारायण राणे यांनी भाजपमध्ये जावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुणे येथे बोलताना दिला. नारायण राणे भाजप गेल्यास त्यांचे भविष्य उज्जवल आहे, हा माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.