सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (09:04 IST)

नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्रात येणार

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते.पंतप्रधान मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत.
 
 
आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू येथे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक 14 जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत."