बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (08:51 IST)

संभाजीराजेंचा शिवसेनेत प्रवेश करण्यास नकारच? शिवसेनेच्या शिष्टमंडळाचं निमंत्रण धुडकावले?

Sambhaji Chhatrapati
छत्रपती संभाजीराजेंना (Sambhaji Raje) खासदार व्हायचे असेल तर त्यांना शिवबंधन बांधावे, अशी अटच शिवसेनेने (Shivsena) ठेवली आहे. यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज संभाजीराजेंची भेट घेऊन उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत शिवसेनेत प्रवेश करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांचा निरोप दिला आहे. परंतु, संभाजीराजेंनी प्रवेश करण्यास नकार दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळली आहे.
 
राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हालचालींना वेग आला आहे. संभाजीराजे यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. यामध्ये शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा समावेश शिष्टमंडळामध्ये होता. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही छत्रपती संभाजीराजे यांच्याशी फोनवरून शिवबंधन बांधण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे.
 
वर्षा निवास्थानी उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचे उद्धव ठाकरे यांचा निरोप शिवसेना शिष्टमंडळाने संभाजीराजे यांना दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश करावा. तरच संभाजी राजे छत्रपती यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
 
संभाजीराजेंनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे निमंत्रण अद्याप स्वीकारले नसून उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नसल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. तर संभाजीराजेंनी शिवसेनेची अधिकृत उमेदवारी स्वीकारणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे.