मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (08:24 IST)

औरंगाबाद जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून हत्या , संशयिताच्या लासलगावमध्ये आवळल्या मुसक्या

arrest
औरंगाबाद येथे एकतर्फी प्रेमातून काल शनिवारी दुपारी हत्या व  ते गंभीर कृत्य करत  फरार झालेल्या शरण सिंग सविंदर सिंग शेटी (20) या संशयितास लासलगाव येथील गणेश नगर भागातून अटक करण्यात आली आहे.
 
संशयिताला त्याच्या बहिणीच्या घरातून पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने गुप्तता पाळत आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही तासातच अटक करून आरोपी औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
 
याबाबत अधिक माहिती अशी, की वेदांत नगर पोलीस कार्यालयात काल सुखप्रीत कौर उर्फ कशिश प्रतिपाल ग्रंथी या कॉलेज युवतीचा एकतर्फी प्रेमातून शस्त्राने वार करून शरण सिंग सविंदर सिंग शेटी याने वार करून खून केला होता.
 
याबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तलायातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल काल झाली होती. या खुनानंतर शरण सिंग सविंदर सिंग शेटी हा फरार झाला होता. या फरारी संशयिताचा शोध पोलीस यंत्रणा तातडीने करत होती.
 
याबाबत पोलीस आयुक्तलयातील वेदांतनगर पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना संशयित आरोपी लासलगाव येथील त्याचे बहिणीकडे आला असल्याची माहिती दिली होती.
 
त्यानुसार खबर मिळताच गुप्तता पाळत तातडीने पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे व लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस अंमलदार योगेश शिंदे, हवालदार संदीप शिंदे विजय बारगल यांच्या पथकाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास लासलगाव येथील श्री गणेश नगर मधील गणेश मंदिरामागे त्याच्या बहिणीच्या घरात छापा टाकला.
 
यात फरार असलेला शरण सिंग सविंदर सिंग शेटी यास ताब्यात घेतले. याबाबत औरंगाबाद पोलिसांना कळविताच औरंगाबाद पोलिसांचे पथकाने लासलगाव येथे दाखल झाले आणि आरोपीस ताब्यात घेतले.