कोकण आणि विदर्भात दोन दिवस पावसाचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी रात्री तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली असतानाच, आता पुढील 48 तासांत कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 23 ते 26 मे दरम्यान कोकण आणि गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.