त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ मंदिराला सोन्याचा कळस
त्र्यंबकेश्वर : आज निवृत्तीनाथ महाराज मंदिरावर कळस रोहण कार्यक्रम उत्साहात झाला.यावेळी जमलेल्या वारकरी भाविकांनी निवृत्ती महाराज की जय अशा घोषणा देत फुले उधळली. तसेच बहुत दिवस होती मज आस ! आजी घडले सायासीरे!!' आजी सोनियाचा दिनु अशा शब्दात वारकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत संत निवृत्तीनाथांच्या चरणी माथा टेकत दर्शन घेतले.
दुपारी १ वाजता हा कळस बसविण्यात आला. यावेळी १० हजार भाविकांनी हजेरी लावली होती. हा कळस बसविला गेल्याने वारकऱ्यांची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली आहे. तसेच सुवर्णकळस बसविल्याने मंदिराची शोभा वाढून मंदिर जीर्णोद्धार पूर्णत्वास गेला आहे.
यावेळी नामवंत कीर्तनकार व पुजक जयंत महाराज गोसावी , प्रसाद महाराज अंमळनेर ,अँड भाऊसाहेब गंभीरे ,संतवीर बंडातात्या कराडकर सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लीप्ते गंभीरे, खासदार हेमंत गोडसे पोलिस निरीक्षक रणदिवे, त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी विविध संस्था व दिंड्यांचे प्रमुख, प्रतिनिधी व निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.