शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (15:20 IST)

नरेश म्हस्के यांनाच अल्झायमर झाला आहे

anand paranjape
सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती वाढविण्याच्या गप्पा मारणाऱ्या नरेश म्हस्के यांनाच स्मृतीभ्रंश झालेला आहे.
कारण, त्यांनी सन 2005 मध्ये नारायण राणेंसोबत जाताना  केलेली गद्दारी आणि आपल्याच पक्षाचे रवींद्र फाटक यांना 2014 मध्ये पराभूत करण्यासाठी केलेल्या कुरापती म्हस्के विसरले आहेत. त्यांना अल्झायमर झाला आहे. त्यामुळेच त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचारांची गरज आहे,  असा प्रतिटोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.
 
सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती कमजोर झाली असून त्यांना टाॅनिक पाठवू, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली होती. त्याचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. परांजपे यांनी, म्हस्के यांचा उल्लेख फुटीर शिंदे गटाचे प्रवक्ते , असा उल्लेख करून सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती किती दांडगी आहे, याचा पुरावा संसदेत जाऊन म्हस्के यांनी शोधावा. आपल्या 13 वर्षाच्या कारकीर्दीत त्यांना आठवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor