शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (23:28 IST)

Nashik : नाशिकात स्वाईन फ्लूचे 24 तर डेंग्यूचे 19 रुग्ण आढळले

सध्या कोरोनाचा प्रदृभव कमी होत असताना नाशिक जिल्ह्यात स्वाईनफ्लूचे 24 तर डेंग्यूचे 19 रुग्ण आढळते आहे . आठवड्याभरात साथीच्या रुग्णांची संख्या वाढली असून तापाची लक्षणे असलेल्या 730 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  नाशिक मध्ये सध्या नागरिक साथीच्या आजाराच्या विळख्यात अडकत आहे. 
 
नाशिकात नागरिक सध्या स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि तापाच्या आजाराने त्रस्त झाले आहे. बदलणाऱ्या हवामानामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल करण्याचे दावेदेखील फोल ठरले आहे. वाढत्या आजारावर वेळीच उपचार करण्याची आवश्यकता आहे.अशी मागणी नागरिक करत आहे.