बुधवार, 3 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (18:26 IST)

Nashik : कर्तव्यदक्ष पोलिसाचे बाईकवर डब्बा ठेऊन जेवण, व्हिडीओ व्हायरल!

Policeman Eating On Bike Video
Twitter
सध्या सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मनाला हलवून टाकणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ आहे जो आपले कर्तव्य बजावताना जेवणाचा डबा मोटर सायकलवर ठेवून खात आहे. 
हा व्हिडीओ नाशिक शहरातील असून नाशिकच्या पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावतानाचा व्हिडीओ आहे. नाशिक शहर सुरक्षित राहण्यासाठी हे पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावतात. जेणे करून आपले शहर आणि शहरातील जनता सुरक्षित व्हावी. 

पोलीस कर्मचारी शांतपणे आपली कर्तव्य बजावतात. हा व्हिडीओ नाशिकच्या पोलिसांच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला पाहून नेटकरी या पोलिसांना सलाम करत आहे. आपली शहरे सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या अशा सर्व नायक-नायिकांना सलाम.
 
Edited by - Priya Dixit