शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , मंगळवार, 5 एप्रिल 2022 (10:40 IST)

नाशिक: गांधील माशी चावल्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

honey bee attack
गांधील माशी चावल्याने येथील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यशवंत आनंदा भोये (वय ५२) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.हवालदार भोये गार्डची कामगिरी बजावत होते.त्या ठिकाणी त्यांना गांधील माशीने चावा घेतला.
 
त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तत्काळ येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. यशवंत भोये यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.