गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (09:20 IST)

नाशिक आर्मी एव्हिएशन'चं प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडाल्याने खळबळ

नाशिक : आर्मी एव्हीएशनच्या प्रतिबंधित क्षेत्रात अज्ञाताने विना परवानगी ड्रोन उडवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशनचा ट्रेनिंग स्कूल हा परिसर नो ड्रोन झोन व प्रतिबंधित क्षेत्र असल्याने या ठिकाणी कोणालाही ड्रोन उडविण्यास बंदी आहे.

25 ऑगस्ट रोजी अज्ञाताने गांधीनगर येथील या परिसरात रात्री 10 वाजे दरम्यान 2 ते 3 मिनिटांसाठी ड्रोन उडविला. याप्रकरणी मनदीपसिंग ईश्वर सिंग (वय 35) यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, ते बेस ड्युटी ऑफिसर म्हणून कामावर असताना तेथील ड्युटी ऑपरेटर नायक जर्नल सिंग यांनी त्यांना सांगितले की, तेथील कॅटसच्या हद्दीत ड्रोन उडत असल्याचे त्यांना मेजर आशिष यांनी फोन करून कळवले.

सिंग यांनी खात्री केली असता हा ड्रोन सुमारे 800 फुटांवर फिरत होता. म्हणून त्यांनी लगेच कर्नल रावत यांना फोन करत हे ड्रोन फायरिंग करून पाडण्याची परवानगी मागितली. तेवढ्यात हा ड्रोन बाहेर निघून गेला. कर्नल रावत यांनी हा ड्रोन पुन्हा आल्यास ते उडवून देण्यास सांगितले. मात्र, नंतर पुन्हा हा ड्रोन तेथे आला नाही. म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला सांगितली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे करीत आहेत.