शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (08:50 IST)

नाशिक : मविप्रच्या निवडणुकीत “इतके” टक्के मतदान झाले

voters
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळातील जागांसाठी मतदान झाले. मतदानाला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी संस्थेचे १० हजार १९७ सभासदांपैकी ९ हजार ६८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
कार्यकारी मंडळासाठी ९४.९३ टक्के तर सेवक सभासदासाठी ८८.३४ टक्के असे एकूण ९४.६४ टक्के विक्रमी मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान चांदवड तालुक्यात ९८.१० टक्के झाले आहे. तर सर्वात कमी नाशिक शहर ८७.३३ टक्के मतदान झाले आहे.