शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (08:01 IST)

नाशिक :२१ लाखाच्या घरफोड्या करणाऱ्या धुळ्याच्या टोळीस अटक

arrest
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चोरीचा तपास करत असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले यांना मिळालेल्या खबरीवरून अंबड पोलिसांनी धुळे येतेच जाऊन ७ जणांच्या टोळीला अटक केली आहे.
प्रथम पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात दोघे जण अडकले होते त्यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी ५ जणांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून अंबड पोलिसांच्या हद्दीतील ९ आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ अश्या १० घरफोड्यांचा उलगडा झाला असून पोलिसांनी त्यांच्याकडून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
 
आरोपींपैकी एक आरोपी पेठरोड नाशिक येथे राहत होता आणि घरफोड्या करून धुळे जिल्ह्यात ही टोळी निघून जात असे. त्यामुळे ही टोळी लवकर हाती सापडत नव्हती.
 
याबाबत माहिती अशी की नाशिक शहर व परिसरात घरफोडी करण्याऱ्या इसमाचा शोध घेत असताना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्यात गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले आणि हवालदार संजू जाधव याना माहिती मिळाली कि काही घरफोडे नाशिक येथे घरफोड्या करून धुळे जिल्ह्यात फरार होतात,या अनुषंगाने तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरिक्षकी वसंत खतेले, पोलीस नाईक पवन परदेशी याना मिळालेल्या खबरीवरून त्यांच्यासह किरण गायकवाड, सचिन कारंजे पोलीस शिपाई दीपक शिंदे , समाधान शिंदे , प्रवीण राठोड, अनिल ढेरंगे , राकेश राऊत, संदीप भुरे, सागर जाधव, जनार्दन ढाकणे, घनश्याम भोये, अनिल गाढवे, यांनी धुळे येथे सापळा रचून सौउद अहमद मोहमद सलीम अन्सारी ( वय २१, रा. शंभर फुटी रोड, सरदार हॉलच्या मागे शादाबनगर धुळे) व हेमंत उर्फ सोन्या किरण मराठे (वय २८, रा. नवनाथ नगर, शनीमंदिर जवळ, पेठ रोड, पंचवटी नाशिक) हे दोघे पोलिसांच्या सापळ्यात सापडले यापैकी मराठे हा मूळचा धुळे येथील हॉटेल डीडीआरसी च्या पाठीमागे श्रीराम ट्रान्सपोर्ट नगर धुळे येथील रहिवासी आहे .
 
या दोघांची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांचे साथीदार शाकिर उर्फ पप्पू बंम इब्राहिम शहा (वय ३२, रा. आझाद नगर, भोईवाडा धुळे ) तोसीफ उर्फ मामू अजीज शहा (वय ३० ,रा. अंबिका नगर धुळे), समीर अलीम शहा ( वय 23 वर्ष, रा. जय शंकर कॉलनी कबीर मंदिराजवळ चाळीसगाव रोड , धुळे) इस्माईल उर्फ मारी अहमद शेख (वय 20 वर्षे रा. रूम नंबर दोन आझाद नगर वडजाई नगर मारुती मंदिरात जवळ धुळे) वसीम झहीरुद्दीन शेख ( वय 32 वर्षे, रा. बोरसे कॉलनी वडजाई रोड मुगणी मस्जिद जवळ धुळे ) या सर्वाना धुळे येथे जाऊन अंबड पोलिसांनी अटक केली. या यशस्वी तपासाबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक वसंत खतेले आणि पथकाचे अभिनंदन केले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor