गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 एप्रिल 2023 (11:49 IST)

लाकडी कपाटामुळे झोपेतच चिमुकल्याचा मृत्यू

Nashik News नाशिक शहरात जाधव संकुल परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबातील तीन वर्षाच्या मुलाच्या अंगावर घरातील लाकडी कपाट पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शौर्य सुजित विश्वकर्मा असे या मृत्यू झालेल्या तीन वर्षीय बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
नेमकं काय घडलं ?
बुधवारी पहाटे साडेसहा वाजत तीन वर्षांचा शौर्य साखर झोपेत असताना नियतीने घात केला. झोपेत मुलाच्या अंगावर भले मोठे लाकडी कपाट पडले. चिमुकल्याच्या अंगावर कपाट पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु यावेळी डॉक्टरानी त्यास तपासून मृत घोषित केले. 
 
या घटनेमुळे त्याच्या पालकांनी देखील हंबरडा फोडला. तीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.