रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 एप्रिल 2023 (07:52 IST)

अजित पवार त्यांच्याबद्दल रत्नागिरीच्या सभेत सविस्तर बोलणार आहे- राज ठाकरे

raj thackeray
यावर अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे सांगितले होते. या संदर्भात राज ठाकरे यांना एका कार्यक्रमात अजित पवार यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे  म्हणाले की, त्यांच्याबद्दल रत्नागिरीच्या सभेत सविस्तर बोलणार आहे.
 
एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यातील विविध नेत्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी काही मजेशीर उत्तरे दिली आहेत.
 
यावेळी राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विचारले असता  जपून राहा असा सल्ला देणार, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचारले असता वरती संबंध नीट ठेवा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता त्यांना काय सांगणार स्वयंभू आहेत असे ते म्हणाले. यावेळी त्यांना अजित पवार यांच्याबद्दल विचारले असता राज ठाकरे यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे.
 
राज ठाकरे म्हणाले की, खर तर मला 5 तारखेच्या रत्नागिरीच्या सभेमध्ये त्यांच्याबद्दल सविस्तर बोलायचे आहे, असे संकेत त्यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, मला एका वाक्यात बोलता नाही येणार नाही, पण तरीही त्यांना सल्ला देईल की, बाहेर जेवढे लक्ष देत आहात तेवढं काकांकडेपण लक्ष द्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor