शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 24 एप्रिल 2023 (08:52 IST)

तेव्हा तुम्ही फडणवीस यांना राजकारण करु नका, असं का सांगितले नाही- सुषमा अंधारे

Sushma Andhare
काही दिवसापूर्वी  महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला होता. " कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी आजही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टोला लगावला होता. या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले.
 
सुषमा अंधारे म्हणाल्या, गेली दोन वर्षी कोरोना काळ सुरू असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऐवजी पीएम केअर फंडात पैसे भरा, असे त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. तेव्हा तुम्ही फडणवीस यांना राजकारण करु नका, असं का सांगितले नाही, असा सवाल अंधारे यांनी राज ठाकरे यांना केला.
 
"जेव्हा भाजप काही लोकांना पुढे करुन राज्यातील मंदीरे खुले करण्यासाठी आंदोलन करत होते. त्यावेळी सगळी प्रार्थनास्थळ बंद होती. पण फक्त वारीच बंद आहे, असं चित्र दाखवून राज्यात अस्थिरता निर्माण करणाऱ्या भाजप नेत्यांना राजकारण करु नका, असे राज ठाकरे का म्हणाले नाहीत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor