शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (09:14 IST)

खारघर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,-किरीट सोमय्या

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन राज्य सरकारने केलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढत असताना सरकारने या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या नागरिकांसाठी शेडची व्यवस्था केली नाही. तसेच सुमारे अडीच ते तीन तास नागरिकांना उन्हात बसवून ठेवलं, यामुळे १४ जणांचा बळी गेला, असा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला.
 
या आरोपानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खारघर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
खारघर दुर्घटना घडल्यानंतर भाजपाचा एकही नेते मृतांच्या कुटुंबियांना भेटायला का गेला नाही? असं विचारलं असता किरीट सोमय्या म्हणाले, “मी स्वत: खारघरला गेलो होतो. पण तुम्ही म्हणता किरीट सोमय्या खारघरला गेले नाहीत. मी स्वत: खारघरला गेलो होतो. ही दुर्दैवी घटना आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी अधिकारी नेमला आहे.”
 
Edited By - Ratnadeep ranshoor