गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (09:11 IST)

नाशिक जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलली

नाशिक जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा या चार जिल्हा बँकांची निवडणूक दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
 
थकीत कर्जाची वसुली करणे, आर्थिक स्थिती मुळ पदावर आणणे, व्यवसायात वाढ करणे, संचित तोटा कमी करणे या उपाययोजना करण्यासाठी चार जिल्हा बँकावर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक आणि प्रशासक मंडळास पुरेसा कालावधी मिळावा याकरीता निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे .